आमच्याविषयी

श्री कपिलेश्वर वाद्यपथक हे श्री कपिलेश्वर प्रतिष्ठान ट्रस्ट अंतर्गत दि. २ जून २०१६ रोजी स्थापन झाले. प्रथम वर्षात पथकात एकूण ४० सदस्य सहभागी झाले. या पथकात ३० ढोल, ८ ताशे, ३ ध्वज असा लवाजमा प्रतिष्ठान तर्फे सामील करण्यात आला.
२०१६ साली पहिल्याच वर्षी वाद्यपथकाने तब्बल ३० मिरवणुका गाजविल्या. त्यानंतर दुसर्या वर्षी वाद्यपथकात पहिल्या वर्षीच्या यशानंतर सदस्यांच्या संख्येत ७० पर्यंत वाढ झाली. तसेच ४० ढोल, १२ ताशे, १ टोल, ३ ध्वज असा पथकाचा ताफा वाढला. दुसऱ्यावर्षी पहिल्या वर्षीच्या दुपटीने मिरवणुकातून नगरकरांना आवाजाचा एक मनसोक्त आनंद दिला. श्री कपिलेश्वर वाद्यपथक हे कार्यकारिणी सदस्यांच्या सूचनेप्रमाणे व विचार विनिमयाने चालते.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-

गिरीश रासकर, पथकप्रमुख.
गिरीश रासकर हे सध्या सकाळ मिडिया प्रा. लि. मध्ये कार्यरत असून ढोल ताशा महासंघ, नगर चे उपाध्यक्ष म्हणून हि कार्यरत आहेत. समाजकारणात ८ वर्षांपासून सक्रीय आहेत.  ते निसर्गप्रेमी असून, समाजासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या संयमी स्वभावामुळेच त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. श्री कपिलेश्वर वाद्यपथकाची स्थापना त्यांनीच केली आहे. पथकात प्रथक प्रमुख म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. ते लीड ढोल वादक आहेत.

निलेश डांगे, पथकप्रमुख.
हे सध्या कोपरगाव येथे अमेझोन कंपनीत टीम लीडर म्हणून काम करत आहेत. श्री कपिलेश्वर वाद्यपथकाच्या स्थापनेत श्री गिरीश रासकर यांच्याबरोबरच निलेश यांचाही मोठा सहभाग आहे. अत्यंत चिकाटी, मनमिळाऊ स्वभाव यामुळे समाजात त्यांना मोठा मानसन्मान मिळत आहे. निलेश हे लीड ढोल वादक असून, पथकप्रमुख आहेत.

ओंकार गिरवले, खजिनदार.
ओंकार हे सिव्हील इंजिनिअर असून, कंत्राटदार म्हणून काम करत आहेत. बिल्डर्समध्ये सर्वात तरुण उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ओंकार हे गणितीज्ञान असल्याने पथकाचे जमा-खर्च अत्यंत बारकाईने ते दरवर्षी मांडत असतात. ओंकार ढोल-ताशा वादक असून, सर्व सराव त्यांच्या निगराणीखाली होतो.

सागर आहेर, पथक लीडर.
अत्यंत स्वाभिमानी हुशार व तडफदार अशी सागर आहेर यांची ओळख आहे. सागर सध्या सिव्हील इंजिनिअरींग करत आहेत. हे अत्यंत हुशार ढोल वादक असून ढोल, ताशा, ध्वज शिकविण्याची अत्यंत आवड आहे. ते सध्या ढोल-ताशा महासंघाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आहेत.

मोहित चौधरी, ताशा लीडर.
मोहित हे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थानचे सेवेकरी आहेत. तसेच ते युवा क्रिकेटपट्टू असून, लहानपणापासूनच त्यांनी क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. हे पथकाचे लीड ताशा प्लेयर असून, त्यांना शिकविण्याची फार आवड आहे. मोहित पथकाच्या स्थापनेपासून ताशा लीडर आहेत.

Instagram Feed

@shrikapileshwar

Follow Me