मंगळवार, ३ जुलै, २०१८

श्री कपिलेश्वर वाद्यपथक २०१८ वाद्यपूजन सोहळा

श्री कपिलेश्वर वाद्यपथक २०१८ वाद्यपूजन सोहळा 
श्री कपिलेश्वर वाद्यपथकाचे आज सन २०१८-१९ वर्षासाठीचे वाद्यपूजन करण्यात आले. यावेळी  श्री कपिलेश्वर प्रतिष्ठान चे पदाधिकारी , अ. नगर ढोल ताशा महासंघ पदाधिकारी व समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

मंगळवार, २९ मे, २०१८

कपिलेश्वर मित्र मंडळ - श्री गणेश आगमन सोहळा २०१७

कपिलेश्वर मित्र मंडळ श्री गणेश आगमन सोहळा...

कपिलेश्वर मित्र मंडळ हे अहमदनगर शहरातील एक महत्वाचे, मानाचे मित्र मंडळ आहे. दरवर्षी शहरातील माळीवाडा येथे गणेशोत्सवात श्री गणेशाची स्थापना केली जाते. मागील वर्षी गणेश स्थापनेच्या वेळी श्री कपिलेश्वर वाद्यपथकाच्या वादकांनी उत्स्फूर्त जोशात गणेशाला वंदन केले.

श्री विशाल गणेशाच्या चरणी मानवंदना २०१७अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असल्याने दरवर्षी गणेशोत्सवाच्या सुरुवातीला श्री कपिलेश्वर वाद्यपथकातर्फे श्री विशाल गणेशाला वादनातून मानवंदना देण्यात येते. गेल्यावर्षीही अतिशय तालबद्ध रीतीने श्री गणेशाला मानवंदना देण्यात आली.

रविवार, २७ मे, २०१८

श्री विशाल गणेश मंदिर वादन २०१७

मे २७, २०१८ 0
विशाल गणेश मंदिर वादन २०१७ अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपतीला प्रथम मानवंदना देण्यात येते. दोन ते अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराचे मुख्य गाभारा व मुख्य दरवाजा उघडते वेळी श्री कपिलेश्वर वाद्यपथकाने आपल्या वादनाने श्री गणेशास मानवंदना दिली. यावेळी नगर शहरातीलच नव्हे तर जिल्हा , परजिल्ह्यातील असंख्य भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे हा वादन सोहळा रंगला... 
श्री कपिलेश्वर वाद्यपथक दरवर्षी श्री विशाल गणेशासमोर ढोलपथकाद्वारे नतमस्तक होत गणेशोत्सवाची सुरुवात करत असते. गेल्या वर्षीही गणेशोत्सवाच्या सुरुवातीला गणेशासमोर आपल्या खास शैलीत वादन करून श्री कपिलेश्वर वाद्यपथकाने ही परंपरा जपली.

Instagram Feed

@shrikapileshwar

Follow Me